facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / बांधकाम परवानगी धोरणात बदल

बांधकाम परवानगी धोरणात बदल

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीबाबत अवलंबली जाणार जुनी पद्धत आता एक डिसेंबरपासून बंद होणार आहे. राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणेच नाशिकमध्येही आता बांधकाम परवानगी देण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे.

बांधकाम परवानगी संदर्भात आता ऑफीस कॉपी (ओसी) नव्हे तर फर्स्ट कॉपी (एफसी) अंतिम मानली जाणार आहे. तसेच नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांबाबत आर्किटेक्टकडून होणारा हस्तक्षेप व हितसंबध एक डिसेंबरपासून थांबणार असून थेट अर्जदाराशीच नगररचना विभाग कागदोपत्री संपर्क करणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर नगररचना विभागाकडून ऑफीस कॉपी अर्जदारास दिली जाते. या कॉपीच्या आधारावर व्यावसायिक बांधकामाला सुरुवात करतो. त्यामुळे टीडीआरसारखे घोळ तयार होतात. तसेच ही पद्धतच पूर्णत: चुकीची असल्यानेच आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पद्धत बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. नगररचना विभागात बांधकाम परवानगीसदर्भात ऑफीस कॉपी जमा केल्यानंतर त्याच्यातील अटीशर्तींची पूर्तता अर्जदाराला करावी लागणार आहे. त्यानंतरच फर्स्ट कॉपी दिली जाईल.

हस्तक्षेप टळणार

बांधकाम परवानग्यांबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आता आर्किटेक्टमार्फत केली जात होती. आर्किटेक्ट व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची या निमित्ताने चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे केवळ ओसीवरच परवानगींंचे काम सुरू होते. परंतु आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी थेट मूळ अर्जदाराशीच कागदोपत्री व्यवहार करणार असल्याने नगररचना विभागात आर्किटेक्ट यांचा होणारा हस्तक्षेप व लागेबांधे टळणार आहे.

२५० प्रकरणे अडचणीत

राज्य सरकारने २८ जानेवारी २०१६ ला नवे टीडीआर धोरण आणले. परंतु यापूर्वी दाखल प्रकरणे मात्र नियमांच्या कचाट्यात सापडली होती. महापालिकेत अशी अडीचशे प्रकरणे टीडीआरमुळे मंजूरीसाठी अडकली आहेत. यासाठी सरकारकडून टीडीआर धोरणापूर्वी संबंधित अर्जदाराकडे नोंदणीकृत टीडीआर असेल तर त्याला परवानगी द्यावी, अशी सूचना करण्यात आली. परंतु नगररचनाकडे दाखल असलेल्या अडीचशे अर्जदारांकडे मात्र नोंदणीकृत टीडीआर नसल्याने आयुक्तांनी ही प्रकरणे पुन्हा राज्य सरकारकडे मार्गदर्शनासाठी पाठवली आहे. त्यामुळे ही प्रकरणे अडचणीत सापडली आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *