facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / ७२ तासांची मुदत आज संपणार

७२ तासांची मुदत आज संपणार

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा बाद केल्या. या निर्णयाचे स्वागत होत असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागपूर सुधार प्रन्यासकडून आलेली डिमांड, आणि नझुल भाड्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

महसूल विभागाशी संबंधित सर्व आकारणी तसेच शुल्क पाचशे व हजार रुपयांच्या चलनात राष्ट्रीयकृत बँकेत स्वीकारल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहरातील नझूल भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनीचे वार्षिक भू-भाटक, ज्या भूखंडधारकाचे भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाबाबत देय असणारे दंड, जमिनीचे वापरात बदल केल्याबाबत जमिनीचे शर्त भंग अन्वये देय असणारी रक्कम तसेच भूखंड वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्याबाबत देय असणाऱ्या तारण शुल्कासाठी पाचशे आणि एक हजारच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. भूखंडधारकाजवळ असलेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनाद्वारे शासकीय खजिन्यात ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. कोषागार विभागातील सर्व व्यवहार जवळपास ऑनलाईन होत असल्याने कोषागार कार्यालयातील काम नियमित सुरू असल्याचे जिल्हा कोषागार विभागातील वरिष्ठ अधिकारी मोना ठाकूर यांनी सांगितले.

डिमांड ८ नोव्हेंबरपूर्वीची हवी

नागपूर सुधार प्रन्यासने ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वी निर्गमित केलेल्या मागणी पत्रानुसार नासुप्रच्या रोकड विभागात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबरनंतरच्या मागणी पत्रासाठी ५०० आणि १ हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार नाही. बॅंक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्येही पैसे स्वीकारले जाणार असून यासाठिची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर २०१६ ही असेल असे आवाहन नासुप्रने केले आहे. ज्याच्या नावाने वसुलीबाबत मागणी करण्यात आली आहे, त्या व्यक्तीने स्वतः अथवा त्या व्यक्तीने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला हे पैसे भरता येणार आहे. इतर व्यक्तीच्या माध्यमातून पैसे भरले जात असेल तर ओळखीचा वैध पुरावा सादर करणे आ‍वश्यक आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *