facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / आधीच मंदी, त्यात नोटांची तंगी
money

आधीच मंदी, त्यात नोटांची तंगी

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा बाजारातील रोखीच्या व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. गेले अनेक महिने मंदीचा सामना करीत असतानाच नवा रोख रकमेचा तुटवडा (कॅश क्रंच) निर्माण झाल्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती निर्माण झाली असून, हे चित्र आणखी काळ राहील, अशी भीती बाजारपेठेतून व्यक्त करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, दुष्काळ आणि वाढते व्याजदर यांमुळे गेले अनेक महिने बाजारपेठेत मंदीचे सावट होते. मात्र, गेल्या काही काळात त्यामध्ये हळुहळू सुधारणा होण्यास सुरूवात झाली होता. यंदा देशाच्या सर्व भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळात वाहने, गृहोपयोगी उपकरणे, कपडे आणि सोन्याचांदीचे दागिने या वस्तूंची शहरी आणि ग्रामीण भागांमध्येही मोठी खरेदी झाली. त्यामुळे अन्य क्षेत्रांमध्येही मंदीचे सावट हळुहळू दूर होणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यातच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचा मोठा फटका बसला आहे.
या निर्णयामुळे बाजारात रोख रकमेचा अचानक मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहर व परिसरातील बँकांमधून गुरूवारी अन्य नोटांच्या स्वरूपात पैसे देण्यास सुरूवात झाली. मात्र, प्रत्येक खातेदारास फक्त चार हजार रुपयेच मिळत आहेत. ही रक्कम नागरिकांकडून तातडीच्या दैनंदिन गरजांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे तुलनेने चैनीच्या वस्तू, हॉटेलिंग आणि नाटक-सिनेमा यांवरील खर्च त्यांच्या प्राधान्यक्रमांतून मागे गेला आहे. तसेच अन्य वस्तूंची खरेदीही याच कारणामुळे जवळपास थंडावली आहे. आणखी काही काळ नागरिकांना बँकांमधून तुटपुंजीच रक्कम मिळणार असल्याने अत्यावश्यक गरजांशिवाय अन्यत्र त्या रकमांचा वापर करण्याऐवजी त्या वाचवून ठेवण्याकडे अनेकांचा कल आहे. चेक, डेबिट-क्रेडिट कार्डे आणि ऑनलाइन पेमेंटद्वारे काही प्रमाणात व्यवहार सुरू आहेत. मात्र, या सर्व पर्यायांचा वापर करण्याचे प्रमाण समाजात कमी आहे. भविष्यात त्यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.

बाजारात ग्राहकसंख्या किरकोळच
घाऊक बाजारपेठेत चेक्स, डीडी, आरटीजीएस अशा साधनांचा वापर करून व्यवहार सुरू आहेत. मात्र, किरकोळ बाजारात ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातही मालाला उठाव नाही, असा अनुभव येऊ लागला आहे. हळुहळू सुरू होऊ लागलेल्या मागणीच्या चक्रालाच त्यामुळे ब्रेक लागल्याची टीका या क्षेत्रातून करण्यात येत असून आणखी काही काळ ही स्थिती राहणार, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *