facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / बॅंकांसमोर लांबच लांब रांगा
banks

बॅंकांसमोर लांबच लांब रांगा

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – पाचशे व हजारच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याच्या घोषणेचे पडसाद सर्वच स्तरावर उमटत असून तालुक्यातील सर्वच व्यवहारांवर याचा परिणाम जाणविला. मात्र देशहितासाठी अडचणीचा सामना करीतही सामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, बुधवारी बँकांसह एटीएम बंद राहिल्यामुळे गुरूवारी दिवसभर बँकांमध्ये हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

गुरूवारी सकाळपासून बहुतांश लोकांनी बँकेतून जुन्या नोटा जमा करण्यासाठी रांगा लावल्या. त्यामुळे बँकांसह सहकारी पतसंस्थांमध्ये सुद्धा तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. तर काहींच्याकडे हातात खर्चालाच पैसे नसल्याने उपलब्ध होतील तेथून पैसे काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अद्याप गडहिंग्लज शहरात नवीन नोट दाखल झालेली नसली तरी दोन दिवसात नोटा उपलब्ध होतील, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *