facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / शाहू आघाडीच्या स्वरूपा यड्रावकर बिनविरोध
13516340_115290022235705_871404053873110509_n

शाहू आघाडीच्या स्वरूपा यड्रावकर बिनविरोध

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून प्रभाग क्रमांक तीन (ब) मधील ताराराणी आघाडीच्या उमेदवारासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राजर्षि शाहू विकास आघाडीच्या उमेदवार व माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर बिनविरोध निवडून आल्या. असंख्य नेत्यांनी मोट बांधलेल्या ताराराणी आघाडीला शाहू विकास आघाडीने विजयी सलामी दिली आहे. ताराराणी आघाडीत पडलेली उभी फूट यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे.

या प्रभागातील उमेदवार फुलाबाई बेडगे, शहापरी मुजावर, राजश्री जाधव यांनी यापूर्वीच माघार घेतली होती. गुरूवारी ताराराणी आघाडीच्या संगीता खामकर, अपक्ष कल्पना मोरे आणि शाहू विकास आघाडीच्याच पर्यायी उमेदवार सुनीता खामकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे स्वरूपा पाटील-यड्रावकर या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीची अधिकृत घोषणा २८ ऑक्टोबर रोजी मतमोजणीदिवशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरसेवकपदासाठी अर्ज भरलेल्या नऊजणांनी माघार घेतली. त्यात उज्ज्वला पाटील, संतोष खामकर, संजय पाटील-यड्रावकर, अर्चना शिंगाडे, अलका खाडे यांचा समावेश आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून आणखी कोणत्या प्रभागांतील उमेदवार बिनविरोध होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दुसऱ्यांदा बिनविरोध

पाच वर्षांपूर्वी झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या स्वरूपा पाटील यड्रावकर यांची प्रभाग एकमधून बिनविरोध निवड झाली होती. आता दुसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Check Also

img

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *