facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / पुणे / आता बनावट नोटांचे भूत

आता बनावट नोटांचे भूत

पैसे नसल्याने वणवण करणाऱ्या ग्राहकांच्या मानगुटीवर आता बनावट नोटांचे भूत बसले आहे. जुन्या नोटांचा भरणा करताना पाचपेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास संबंधित ग्राहकांवर तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जुन्या नोटांच्या बंडलात एक जरी बनावट नोट आढळली, तर त्या ग्राहकाची माहिती पोलिसांना देण्यात येत आहे. नोटा तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसलेल्या ग्राहकांना कोणतीही चूक नसताना कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
चलनातील बनावट नोटा रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडून सध्या बँकांमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा भरण्यात येत असून, त्यामध्ये बनावट नोटा सापडत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार एकाचवेळी पाचहून अधिक बनावट नोटा आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे. बँकेत भरणा करताना नोटांमध्ये बनावट नोटा आहेत की नाहीत, याची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा सर्वसामान्यांकडे नाही. या बनावट नोटा चलनातूनच सर्वसामान्यांकडे आलेल्या आहेत. त्यांनी त्या बनावट तयार केलेल्या नाहीत, की त्या वटवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे पोलिसी कारवाईचा त्यांच्यावर बडगा उगारणे अन्याय ठरणार आहे.
‘काळा पैसा जमविणाऱ्यांकडून केंद्र सरकारने ४५ टक्के कर घेतला. त्यांनी हा पैसा कोठून आणला, याची साधी विचारणाही करण्यात आली नाही. याउलट सर्वसामान्यांकडे बनावट नोट आढळली तर ती जप्त करण्यात येते. त्याचे पैसे तर जातातच; त्याशिवाय त्या ग्राहकाचे नाव पोलिसांना कळविण्याचे सौजन्य दाखविण्यात येते. सरकार काळ्या पैशावाल्यांना अभय देत असेल, तर सर्वसामान्यांवरही तशीच वागणूक मिळली पाहिजे, ’अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
..
गुन्हा तर होणारच
बनावट नोटांबाबत गुन्हा दाखल होताना त्या बाळगणाऱ्या व्यक्तीला आरोपी करावे लागते. या नोटा त्या ग्राहकाकडे चलनातून आल्या असल्या तरी, त्याला पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागते. या नोटा बनावट नाहीत किंवा त्या वटवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, असे त्या ग्राहकाला कोर्टात सिद्ध करावे लागते, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *