facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर / नगरच्या शासकीय संस्था मालामाल

नगरच्या शासकीय संस्था मालामाल

चलनातून पाचशे व एक हजाराच्या नोटा बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय शासकीय संस्थांच्या काहीसा पथ्यावर पडला आहे. रद्द होणाऱ्या नोटांद्वारे थकबाकी वसुलीची मुभा दिली गेल्याने नगरच्या महापालिकेसह महावितरण तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांची मिळून सुमारे आठ कोटींची थकबाकी वसुली आज सायंकाळी सहापर्यंत झाली. दरम्यान, सायंकाळी या जुना नोटांद्वारे होणाऱ्या वसुली मोहिमेला आणखी ७२ तासांचा अवधी मिळाल्याचे समजताच या संस्थांच्या वसुली अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

वीज बिलाची थकबाकी वसुली होत नसल्याने महावितरण नेहमी चिंतेत असते. अशीच स्थिती महापालिका व नगरपालिकांचीही आहे. मनपाची घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकी दीडशे कोटीवर गेली आहे तर नगरपालिकांचीही अशी थकबाकी कोट्यवधीची आहे. मोदी सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने काही निर्धारित वेळेची मुदत ठरवून देऊन शासकीय संस्थांना जुन्या नोटांद्वारे त्यांची थकबाकी वसुली करण्यास परवानगी दिली. नागरिकांनीही स्वतःजवळील जुन्या नोटांचा सदुपयोग करीत आपल्या नावावरील थकबाकी भरून खाते थकबाकीमुक्त करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे महावितरणची वीज बिले भरण्यासाठी व मनपाची घरपट्टी थकबाकी भरण्यासाठी चक्क रांगा लागल्या होत्या.

महावितरणने नगर शहरात आज सायंकाळी सहापर्यंत ७२ लाखाची वसुली केली होती तर जिल्ह्यात त्यांची अडीच कोटीची वसुली झाली होती. मनपाने चारही प्रभाग कार्यालयांद्वारे विशेष वसुली कक्ष सुरू केल्याने या चारही कार्यालयांची मिळून दोन कोटी ५४ लाखांची वसुली सायंकाळी सहापर्यंत झाली होती. मनपाने दंड माफी योजना राबवूनही एका दिवसात एवढी वसुली कधी झाली नव्हती. तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांचीही आज दोन कोटी ६४ लाखांची थकबाकी वसुली झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींमुळे शासकीय संस्था मालामाल झाल्याचे चित्र होते. तशात जुन्या नोटांद्वारे थकबाकी स्वीकारण्याची मुभा आणखी ७२ तासांनी वाढविण्याची वार्ता समजल्यावर शासकीय संस्थांच्या वसुली विभागात काहीसे आनंदाचे वातावरण दिसत होते.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *