facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / नाशिक / नगरपालिकांसाठी बहुरंगी लढती

नगरपालिकांसाठी बहुरंगी लढती

जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, सटाणा व भगूर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी कुठे तिरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी, षटरंगी लढती रंगणार आहेत. आज (दि.१२) उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यामुळे आजपासून उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा होऊन रणधुमाळी सुरू होणार आहे. काही उमेदवार व पक्षांनी माघारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे आजपासून मतदारांच्या गाठीभेटी वाढणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने चुरस वाढली आहे.

भगूरमध्ये रंगणार तिरंगी लढत

भगूर नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण १९ उमेदवारांनी माघार घेतली. रिंगणात नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत.

शुक्रवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी उडणार असून, आज (दि.१२) उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिता करंजकर, भाजपकडून शोभा भागवत, तर काँगेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रेरणा बलकवडे या रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी शिवसेनेने १७ जागांवर, भाजपने १६ व आघाडीकडून १५ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. प्राजक्ता बागडे, दत्त कुंवर, चेतन बागडे, विलास पिंगळ असे चार अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अनिता करंजकर (शिवसेना), शोभा भागवत (भाजप), प्रेरणा बलकवडे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)

माघार घेतलेले उमेदवार

अश्विनी मोरे, सुमीत चव्हाण, सचिन दुर्गुडे, मदन गायकवाड, युसूफ खान, संदीप गोरे, विनोद लोट, विनायक काळे, वर्षा पंडोरे, चेतक बलकवडे, मोहिनी वालझाडे, श्रीकांत सोनवणे, फरीद शेख आदी.

नांदगावमध्ये रंगणार पंचरंगी लढत

नांदगाव नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, शुक्रवारी चार जणांनी माघार घेतली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अरुण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश कवडे (शिवसेना), संजय सानप (भारतीय जनता पक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), कल्पना वाघ (अपक्ष). चार पुरुष उमेदवारांविरोधात एकमेव महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे, ही बाब लक्षवेधी आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *