facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / मराठ्यांना आरक्षण मिळावे

मराठ्यांना आरक्षण मिळावे

दलित समाजाला संरक्षण देण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला आहे. तो रद्द झाला तर समाजावर मोठा अन्याय होईल. त्यामुळे तो रद्द केला जाणार नाही. पण गैरवापर टाळण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी योग्य सूचना केल्या तर त्याचा विचार केला जाईल, असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आहे. त्यामुळे दलित समाजाचे काढले जात असलेले मोर्चे प्रतिमोर्चे समजण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.

दलित मराठा ऐक्य परिषदेसाठी मंत्री आठवले शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाहू महाराजांनी ज्या भूमीत ऐक्य करण्याचा प्रयत्न केला. त्या भूमीत होत असलेली ऐक्य परिषद सर्वत्र चांगला संदेश देणारी असेल, असे सांगत आठवले म्हणाले, मराठा समाज ज्यावेळी स्वतःला मागास समजत नव्हता, त्यावेळी मंडल कमिशनकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. आरक्षण ५० टक्केपर्यंत असावे, असे सुप्रीम कोर्टाचे मत आहे. तो कायदा नाही. त्यामुळे देशात ७५ टक्के आरक्षण असावे, असा कायदा केला तर अडचण येणार नाही. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कोर्टामध्ये भूमिका मांडत आहे. पण त्यातून साध्य होईल की नाही हे माहिती नाही. पण कायमस्वरुपी आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी संसदेसमोर विधेयक यावे लागेल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे.

प्रत्येक जातीला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दलित समाजाच्यावतीने काढले जात असलेले मोर्चे हे मराठा मोर्चाला प्रतिमोर्चा असे समजण्यात येऊ नये, असे सांगत आठवले म्हणाले, आरक्षणाच्या मागणीबरोबर अॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबतही या मोर्चातून मागणी केली जात आहे. त्या कायदा रद्द करता येणार नाही. पण त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी दोन्ही समाजांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. चुकीच्या लोकांसाठी कायदा लावला गेला तरी अन्याय होईल. या कायद्याचा वापरच करावा लागू नये, असे वाटत असेल तर अत्याचारच होऊ देऊ नका. बलात्कार करणाऱ्यांना जात नसते. कोपर्डी असेल, नाशिक येथील अत्याचाराचे प्रकरण असेल तिथे जातीचा संदर्भ देण्यात आला. या घटनांमधील गुन्हेगारांना कुणी पाठिंबा दिलेला नाही. पण केवळ दलित आहे म्हणून आंदोलन करणे योग्य नाही. गावांमध्ये दलित समाजावरील अन्यायावेळी मराठा समाजानेही सोबत उभे राहिले पाहिजे. दोन्ही समाजात भविष्याबाबत वाटणारी भीती कमी करण्यासाठी ही ऐक्य परिषद घेण्यात येत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये ३० जागांसाठी आग्रही

उत्तर प्रदेशमधील निवडणुकीबाबत ते म्हणाले, आरपीआय तिथे भाजपसोबत आहे. यापूर्वीची आरपीआयची ताकद पाहून ३० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. बसपाने तिथे आरपीआयच्या जागांवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न असेल. भाजपाने जागा दिल्या नाही तर २५० जागा लढवण्यात येणार आहेत. त्याबाबत भाजपशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्यातील दलित नेत्यांमध्ये मोर्चाच्यानिमित्ताने ऐक्य होताना दिसत आहे. एकत्रित येत असतील तर आपली काहीच हरकत नाही. पण ते येत नाहीत ही खंत आहेच.

सरकारच्या पाठीशी रहा

सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर काँग्रेसने सैनिकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. अशा घटनेमध्ये विरोध विसरुन साऱ्यांनी सरकारच्या पाठीशी राहण्याची गरज असते.

राज्य सरकारला चौकशीचे आदेश

राज्यातील आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार, कुपोषणाचे प्रकार झाले आहेत. याबाबत लक्ष वेधले असता, ते म्हणाले, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात येणार आहेत. ज्या संस्था सरकारची मदत घेऊन अथवा मदतीविना चालवल्या जात असल्या तरी त्यामध्ये दोषी आढळल्यास मान्यता काढून घेतली जाईल.

आठवले भेटणार ट्रम्पना

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर आठवले यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुढील महिन्यात अमेरिकेत जाऊन भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी आठवले यांनी ‘ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचेच आहेत’ असे सांगत राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने अभिनंदन करण्यासाठी व्हाईट हाऊसला जाऊ. डोनाल्ड ट्रम्प यांची भेट पुढील महिन्यात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *