facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / महापालिकेत नोटांचा पाऊस

महापालिकेत नोटांचा पाऊस

दरवर्षी मार्च एडिंगला कराचा भरणा करण्यासाठी उडणारी झुंबड यंदा महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यातच अनुभवली. चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा करापोटी स्वीकारण्याचा निर्णय महापालिकेच्या तिजोरीत रकमेचा वर्षाव करणारा ठरला. कर भरण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला. घरफाळा, पाणीपट्टीसह विविध कर मिळून दिवसभरात तब्बल तीन कोटी रुपयाहून अधिक महसूल गंगाजळीत जमली. जुन्या नोटामुळे मोठी थकबाकीची वसुली झाली. रात्री बारा वाजेपर्यंत सुविधा केंद्रे सुरू राहिली.

महापालिका मुख्य इमारत, शिवाजी मार्केट, गांधी मैदान विभागीय कार्यालय, राजारामपुरी विभागीय कार्यालय आणि ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्रात सात वाजण्याच्या अगोदरच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. आधारकार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स प्रत, नोटांचे नंबर्सची नोंद केली जायची. कराचा भरणा केल्यानंतर नागरिकांची सह्या नोंदवहीत घेतल्या जायच्या. आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

घरफाळा, पाणीपट्टीचा भरणा अधिक

घरफाळा, पाणीपट्टीसह विविध कराचा भरणा करण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. मात्र सर्वाधिक वसुली घरफाळा आणि पाणीपट्टी बिलाची झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन कोटी पाच लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली. यामध्ये घरफाळा एक कोटी २७ लाख, ऑनलाइन घरफाळा २३ लाख रुपये तर पाणी पट्टीचा समावेश ५५ लाख ४१ हजार इतका होता.

………

मोठ्या थकबाकीची वसुली

शहरातील अनेक मिळकतधारकाकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. दोन लाखाहून अधिक थकबाकी वर्षानुवर्षे भरली नाही. महापालिकेने नोटिसा पाठवूनही संबंधितांनी पाठ फिरवली होती. मात्र चलनातून जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ्यावर पडला. दिवसभरात मुख्य इमारतीतील केंद्रात दोन लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १५ मिळकतधारकांनी संपूर्ण घरफाळा भरला.

…………………..

नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्रात पुरेसे कर्मचारी उपलब्ध केले होते. महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली. इतर दिवशी जमा होणारा महसूल हा लाखाच्या पटीत असतो. महापालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी जवळपास तीन कोटी रुपये जमा झाले.

आयुक्त पी. शिवशंकर

रात्री नऊ वाजेपर्यंत जमा झालेली रक्कम

घरफाळा (रोख) : एक कोटी ५२ लाख

घरफाळा (ऑनलाइन) : २३ लाख रुपये

पाणीपट्टी (रोख) : ६१ लाख ७६ हजार रुपये

नगररचना : २७ लाख ७५ हजार

इस्टेट विभाग : सहा लाख ६६ हजार

परवाना : ४ लाख ५० हजार

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *