facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / मुंबई / मीठटंचाईची अफवा

मीठटंचाईची अफवा

नोटांच्या टंचाईने लोक वैतागलेले असताना मिठाची टंचाई झाल्याची अफवा शुक्रवारी देशभरात वणव्यासारखी पसरली आणि आधीच भयग्रस्त असलेल्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मुंबईसह आसपासच्या परिसरातही मिठाची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. २००रुपये किलो दराने मीठ घेण्यास ग्राहक तयार होते.

राज्यात मिठाचा पुरेसा साठा आहे, मीठटंचाईची केवळ अफवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रात्री उशिरा केले. तरीही अफवेच्या वणव्यात अडकलेल्यांनी मीठ खरेदीसाठी शॉपिंग मॉल्सपासून छोट्या दुकानदारांकडे प्रचंड गर्दी केली.

कुर्ला, मुंबई सेंट्रल, वांद्रे, गोवंडी, मानखुर्द, परळ, दादर, बोरीवली, गोरेगाव, कांदिवली आदी भागांमध्ये मिठाच्या टंचाईच्या अफवेचा जोर होता. हा गोंधळ वाढत गेल्याने पोलिसांनीही हस्तक्षेप केला. मुलुंड येथे तर पोलिसांना मेगाफोनचा वापर करून नागरिकांना आवाहन केले. कुर्लाप्रमाणेच अन्य परिसरामध्येही दुकानदारांकडे गोळा झालेल्या ग्राहकांमध्ये वाद झाले. हा सावळागोंधळ मुंबईप्रमाणेच ठाणे, मुंब्रासह ठिकठिकाणी पाहायला मिळाला.

देशभरातही धुमाकूळ

मीठ टंचाईची अफवा उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशाच्या अनेक राज्यातही पसरल्याचे पाहायला मिळाले. कोलकात्यामध्येही मीठ खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी रात्री उशिरा खुलासा करत देशात मीठाची टंचाई नसून, दरही किलोमागे १४-१५ रुपये असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *