facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / मुंबई / ‘रूसा’चे पाच कोटी विद्यापीठाकडे पडून!

‘रूसा’चे पाच कोटी विद्यापीठाकडे पडून!

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीत पैसे नसल्याने काही दिवसांपूर्वी कुलगुरूंनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. तर दुसरीकडे केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत आलेला निधी गेल्या वर्षभरापासून न वापरता पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे. विद्यापीठाच्या या अनागोंदी कारभारामुळे ‘रूसा’ अंतर्गत येणाऱ्या निधीचा दुसरा टप्पा संकटात आला आहे. ५ कोटींचा निधी वर्षभरात वापरलाच नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत देशभरातील विद्यापीठांना निधी दिला जातो. त्यानुसार राज्यातील नऊ विद्यापीठांना गेल्या वर्षी साधारण ४५ कोटींचा निधी देऊ केला आहे. नऊ विद्यापीठांबरोबरच राज्यातील पाच सरकारी कॉलेजांनाही निधींचे वाटप करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक विद्यापीठाला ५ कोटींचा निधी दिला गेला. यात २०१५ साली ४ कोटी ७२ लाखांचा निधी देण्यात आला तर २०१६-१७ साली २८ लाखांचा उर्वारित निधी देण्यात आला होता. विद्यापीठाला आवश्यक सोयी सुविधा, साधने, पुस्तके, सॉफ्टवेअर आणि ईबुकसाठी हा निधी देण्यात आला. मात्र, मुंबई विद्यापीठाने ३० ऑक्टोबर २०१६पर्यंत यातील एकही निधी खर्च केलेला नसून तो तसाच पडून आहे.

यासंदर्भात ‘रूसा’मार्फत विद्यापीठाकडे दोन ते तीनवेळा विचारणा करूनही निधीच्या वापराबाबत माहिती देण्यात आलेली नाही. यासाठी ‘रूसा’कडून विद्यापीठाशी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला कोणतेही उत्तर विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. या अनागोंदी कारभारामुळे ‘रूसा’कडून पुढील निधी देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कारभारामुळे राज्यालाही आर्थिक फटका बसत असल्याची टीका उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे ‘रूसा’ने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

विद्यापीठ म्हणते… हो, उशीर झाला!

याबद्दल विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता हा निधी ३० ऑक्टोबरपर्यंत वापरण्यास उशीर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. मात्र निधीचा वापर करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याने हा उशीर झाला आहे. काही बाबतीत निविदा अंतिम टप्य्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *