facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / नागपूर / विदर्भासाठी चांगले दिवस

विदर्भासाठी चांगले दिवस

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाला डावलले जाते, विदर्भाकडे दुर्लक्ष केले जाते, असे चित्र यापूर्वी होते. वीजपंपाबाबतचाही मोठा अनुशेष निर्माण झाला होता. यावेळी मात्र राज्य शासनाने ९४ हजार ३०३ कृषिपंप विदर्भाच्या वाट्याला दिले, असे सांगत इतर भागांच्या तुलनेत विदर्भासाठी चांगले दिवस आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कृषी तसेच शेतीच्या जोडधंद्यांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता रेशीमबाग येथील मैदानावर ‘अॅग्रोव्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या प्रदर्शनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भातील विकासाचे चित्र उभे केले. राज्यशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची यशोगाथाही यावेळी सांगण्यात आली. यापुढे सेंद्रीय शेतीवर अधिक भर देण्याचे शासनाचे धोरण असेल, असेही फडणवीस म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा प्रथमच कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद १६ हजार कोटी रुपयांवरून २५ हजार कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातूनही राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

–रोजगार निर्मितीला बळ

अगरबत्तीसारख्या उद्योगासाठीही आपण इतरांवर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली भागात अगरबत्तीचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विदर्भातील संत्र्याचा ज्यूस निर्यात करण्याची योजना आहे. मोठ्या प्रमाणात मध तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. जेवढे मध तयार होईल तेवढे विकत घेण्याची तयारी रामदेवबाबा यांनी दर्शविली आहे. रामदेवबाबा ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. कौशल्य निर्माण व्हावे यासाठी लवकरच आयुर्वेदिक वनस्पतींची कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.

–१ डिसेंबरपासून बायो
फ्युएल बस

येत्या १ डिसेंबरपासून नागपुरात बायो फ्युएल बस धावणार आहेत. नागपूर महापालिकेने यासाठीची योजना आखली आहे. ५० वातानुकूलित बसेस पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत. त्यानंतर नागपुरात ४०० बस बायो फ्युएलच्या धावतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

–आजपासून मंथन

रेशीमबाग येथे भरविण्यात आलेल्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १२ नोव्हेंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी दुग्धव्यवसाय, चाराव्यवसाय, मधमाशी पालन, गटशेती, औषधी व सुगंधी झाडांची शेती, डाळींचे उप्तादन, लिंबुवर्गीय उत्पादन अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी बकरी पालन, हळ‍द व आले लागवड, मत्यव्यवसाय, अन्नप्रक्रिया, हरितगृह तंत्रज्ञान, जवस उत्पादन आणि प्रक्रिया अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये ‘विदर्भातील कापूस केंद्र आणि वस्त्रोद्योग विकास’ या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, छत्तीसगडचे कृषिमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि जलसंवर्धनमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अॅग्रोव्हिजनचा समारोप करण्यात येणार आहे.

–असे मिळाले वीजपंप
विदर्भ : ९४ हजार ३०३
मराठवाडा : ७९ हजार ५५०
उत्तर महाराष्ट्र : १८०००
पश्चिम महाराष्ट्र :
४८ हजार

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *