facebook
Sunday , December 4 2016
Home / अहमदनगर / उस उत्पादकांना तोटा होऊ देणार नाही
2325236623552375-2325236623522326236623442366

उस उत्पादकांना तोटा होऊ देणार नाही

कारखाना तोट्यात गेला तरी चालेल पण ऊस उत्पादक तोट्यात जाणार नाही आणि इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव दिला जाईल, अशी ग्वाही कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.

कारखान्याच्या २०१६-१७ या वर्षाच्या ६२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ ऊस उत्पादक सभासद शेतकरी चंद्रशेखर यशवंत देशमुख व राजश्री चंद्रशेखर देशमुख, विष्णु गंगाधर पानगव्हाणे व लक्ष्मीबाई विष्णू पानगव्हाणे, राजेंद्र पंडितराव जाधव व अलकादेवी राजेंद्र जाधव, पंडितराव यादवराव चांदगुडे व मंदाकिनी पंडितराव चांदगुडे, संजय किसन पाचोरे व सुनीता संजय पाचोरे या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. ज्येष्ठ संचालक व माजी आमदार अशोक काळे अध्यक्षस्थानी होते.

आशुतोष काळे म्हणाले, स्व. शंकरराव काळे यांनी या साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कधीही तोटा होऊ दिला नाही. एकवेळ संस्था तोट्यात गेली तरी चालेल, परंतु शेतकरी तोट्यात जाता कामा नये, हे शंकरराव काळे यांचे धोरण मी या कारखान्यात राबविणार आहे. नगर जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Check Also

news-21

राहुरीत मतदारांनी नाकारले ‘परिवर्तन’

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगरपालिका प्रत्येकवेळी तनपुरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *