facebook
Wednesday , December 7 2016
Home / नागपूर / नागपुरात ३ हजार कोटी जमा
no

नागपुरात ३ हजार कोटी जमा

जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम ‌दिसू लागले आहेत. सामान्यांना त्रास होत असला तरी यामुळे दोन दिवसांत नागपुरातील बँकांत ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

नागपूर शहरात सर्व बँकांच्या मिळून ३०० च्यावर शाखा आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९० शाखा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. त्यापाठोपाठ बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा क्रमांक लागतो. तर सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांच्या शाखा कमी असल्या तरी त्यांची खातेदार संख्या मोठी आहे. यामुळेच दोन दिवसांत ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम सरकारी, खासगी व सहकारी बँकेत जमा झाली.

बँकेत पैसा जमा करण्यावर कुठलेच बंधन नाही. पण पैसे काढण्यासाठी एका दिवशी अधिकाधिक १० हजार व आठवड्याला २० हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे भरणा करण्याच्या तुलनेत नागरिकांनी दोन दिवसांत १ हजार कोटी रुपये पुन्हा काढले, असे बँक अधिकाऱ्यांनी

स्पष्ट केले. दुसरीकडे ४ हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. याचा नागपुरातील जवळपास दीड लाख नागरिकांनी लाभ घेतला. त्या माध्यमातून १०० ते १२० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेच्या खात्यात येऊन पडल्या.

–एटीएमच उपयुक्त

बँकेच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एका दिवशी १० हजार व आठवड्याला २० हजार ही मर्यादा आहे. पण एटीएममधून मात्र दिवसाला २ हजार रुपये काढता येणार आहेत. आठवड्याचा विचार केल्यास हा आकडा १४ हजार रुपये होतो. यामुळे एटीएममधून पैसे काढणे उपयुक्त आहे. एटीएम दोन दिवसांत सुरळीत झाल्यावर त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक अधिकाऱ्यांनी केले.

Check Also

news-8

फुके येणार, गाणार जाणार

आवाज न्यूज नेटवर्क – नागपूर – विधान परिषदेचे सहा सदस्य सोमवारी निवृत्त झाले असून, त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *