facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / कुदळवाडीतील उड्डाणपूल लवकरच लोकांसाठी खुला

कुदळवाडीतील उड्डाणपूल लवकरच लोकांसाठी खुला

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी –  पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने निगडी – भोसरी या स्पाइन रस्त्यावर कुदळवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या वर्तुळाकार पुलाचे काम पूर्ण झाले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर हा पूल झाल्यामुळे भोसरी – निगडी या दोन उपनगरांबरोबरच नाशिक आणि मुंबई – पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पुलामुळे कुदळवाडी चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात ही नेहमीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. भोसरी – चिखली, तळवडे, चाकण या औद्योगिक पट्टयालाही त्याचा फायदा होणार असून, जवळच असलेल्या देहू – आळंदी या धार्मिक स्थळांकडे जाणेही नागरिकांना सोपे होणार आहे. या पुलाची एकूण लांबी 4250 स्क्वेअर मीटर आहे. आकुर्डीच्या बाजूला 355 मीटर, कुदळवाडीकडे 600 मीटर आणि भोसरीकडे 150 मीटर पुलाची लांबी आहे.

नवनगर विकास प्राधिकरणाने 62 कोटी 86 लाख रुपये खर्चून हा पूल उभारला आहे. या पुलाचे वैशिष्ट्‌य म्हणजे मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार पुलाला तीन पूल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे कुदळवाडी चिखली, निगडी, पिंपरी व भोसरी या चारही दिशेला जाणे सहज शक्‍य होणार आहे. या पुलामुळे उद्योगनगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मध्यभागी वर्तुळ आणि त्याला जोडलेले तीन भव्य पूल ; तसेच पुलाखालूनही चारही दिशेला जाणारा रस्ता, असा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाछयांनी केला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *