facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदीच्या निर्णायाचे बॉलिवूडकडून समर्थन

नोटाबंदीच्या निर्णायाचे बॉलिवूडकडून समर्थन

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे बॉलिवूडचा दबंग खाननेही स्वागत केले आहे. सलमानने काळा पैशांच्या समस्येवर ऍक्‍शन घेतल्याबद्दल पंतप्रधानांना सलाम केला आहे. आमीर खाननेही या निर्णयाचे स्वागत केले असून, लोक आज ज्या समस्येचा सामना करत आहेत, ती काहीच दिवसांची गोष्ट आहे. भारतासाठी हे आवश्‍यक होते. जर या निर्णयामुळे माझ्या सिनेमावर परिणाम झाला तरी मला खेद वाटणार नाही.’ शाहरुखने हा निर्णय म्हणजे, दूरदृष्टी, अधिकच स्मार्ट आणि राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचे सांगितले आहे. तसेच याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल नक्की येईल, हे अतिशय धाडसी पाऊल होते, असे म्हणले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, ‘2000 च्या नव्या नोटा गुलाबी रंगात आहेत. हा पिंक सिनेमाचा प्रभाव आहे.’ सुपरस्टार रजनिकांत यांनीही ट्‌विटरच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले आहे. नरेंद्र मोदींना सलाम, नव्या भारताचा जन्म होत आहे. जय हिंद असे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला असला, तरी याचे अनेकांनी स्वागत केली. या निर्णयाचे बॉलिवूडमधूनही समर्थन होत असल्याचे चित्र आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीने,मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल अभिनंदन करते. हा सर्वात कठोर निर्णय असून, यामुळे भारतातून भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे, असेही ती म्हणाली. या निर्णयावर सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, रजनीकांत, करण जोहर, अजय देवगम कपिल शर्मा आदींनीही आपली मते मांडली आहेत.

कॉमेडियन कपिल शर्मानेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर अशी लांबच लांब रांग कधी पाहिली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला तुमचा गर्व आहे, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करण्यावरुन वादात सापडलेल्या अनुराग कश्‍यप यानेही या निर्णयाचे स्वागत केलं आहे. कश्‍यप म्हणाला की, मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने इतके धाडसी पाऊल उचलेले पाहिले नव्हते. या निर्णयाने थोडासा त्रास होईल. पण काळ्या पैशांना निश्‍क्रिय करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. सिनेनिर्माता दिग्दर्शक करण जोहरनेही हा निर्णय म्हणजे मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हणलं आहे. या निर्णयाने नरेंद्र मोदीं स्टेडिअमच्या बाहेरपर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करण जोहरच्या ट्‌विटला उत्तरही दिलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्‌विटमध्ये करण जोहर धन्यवाद. आम्हाला, आपल्या भावी पीढिसाठी एक अशा भारताची निर्णय तयार करायचा आहे. जो भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. हॅशटॅग इंडिया फाइटस करप्शन… याशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, ऋषी कपू, सुनील शेट्टी, सोनाली बेंद्रे, सोनाली राऊत, सुनील ग्रोवर आदींनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *