facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / बँकेत जमा झाले २ लाख कोटी

बँकेत जमा झाले २ लाख कोटी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाचशे आणि हजारच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून रद्द केल्यांनंतर नोटा बदलून घेण्यासाठी किंवा बॅंकेत जमा करण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, मंगळवारपासून ते आजपर्यंत देशभरातील बॅंकांमध्ये 2 लाख कोटी रू. जमा झाले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जवळ असणारे पैसे बॅंकेत जमा करण्यासाठी सरकारकडून 30 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.
ब्लूमबर्गने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. पंतप्रधानांच्या निर्णयानंतर देशातील 86 टक्‍के चलन हे रद्द झाले असून आता सध्या लोकांना उपलब्ध असणाऱ्या 14 टक्‍क्‍यांवरच्या चलनावर आपला आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे. दरम्यान, अर्थमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काल सायंकाळपर्यंत बॅंकांमध्ये 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांचे ट्रान्सझॅक्‍शन झाल्याचे सांगण्यात आले होते त्याच आज चांगलीच वाढ झाल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे. आतापर्यंत देशभरातील बॅंकांमध्ये 2 लाख 2 हजार 670 लाख कोटी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाची आर्थिक स्थिती चांगली असून एटीएमच्या सुविधेसाठी आणखी 15 दिवस लागण्याची शक्‍यता व्यक्‍त केली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *