facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / भारत-चीन लष्कर सराव पुण्यात

भारत-चीन लष्कर सराव पुण्यात

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे-‘हँड इन हँड’ मालिकेतला पहिला संयुक्त सराव २००७ साली चीनमधील युनानन भागातील कनमिंगमधील मिलिटरी अॅकॅडमीत झाला होता. २००८ मध्ये भारतातील बेळगाव, २०१३ मध्ये चीन, २०१४ मध्ये पुणे, तर २०१५ मध्ये पुन्हा चीन येथे पार पडला होता. पुण्यात नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेला सराव १२ दिवस चालला होता.
या मालिकेतील सहावा सराव १५ नोव्हेंबरपासून पुण्यात औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरू होईल. लष्कराच्या तुकडी अर्थात कंपनीच्या पातळीवर होणाऱ्या या सरावाचे नियंत्रण बटालियन मुख्यालयातर्फे करण्यात येईल. दोन्ही देशांच्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट या सरावाचे निरीक्षण करेल.

भारत आणि चीनच्या लष्करादरम्यानचा सहावा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सराव १५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. बंडखोरी आणि दहशतवादाविरोधात लढताना दोन्ही लष्करातर्फे वापरण्यात येणाऱ्या डावपेचांचा एकत्रित सराव करणे व नवे डावपेच विकसित करणे; तसेच दोन्ही लष्करांदरम्यान परस्पर सामंजस्य वाढविणे हा या सरावाचा हेतू आहे.

‘हा सराव तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकमेकांच्या शस्त्रास्त्र व यंत्रणांची ओळख करून घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यात युद्धसराव, व्यक्तिगत शस्त्रांमधून फायरिंग व ड्रीलचा सराव करण्यात येईल. याचवेळी गुप्त ठाण्यांची उभारणी, दहशतवाद्यांंचा शोध घेणे, दहशतवाद्यांनी आसरा घेतलेले घर दहशतवादीमुक्त करणे, याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करण्यात येणाऱ्या मदतकार्याचा सरावही केला जाईल. तिसऱ्या मुख्य टप्प्यात प्रत्यक्ष संयुक्त सराव पार पडेल,’ असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 या सरावामुळे पुण्याचे लष्करी सरावासाठीचे केंद्र म्हणून असलेले महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. चीनबरोबरच श्रीलंकेसोबतचा ‘मित्र शक्ती’ हा संयुक्त लष्करी सरावही पुण्यात पार पडला होता. त्याचबरोबर मार्च २०१६ मध्ये अमेरिका, चीन, रशिया, जपानसह १८ देशांचा सहभाग असलेला ‘एक्सरसाइज फोर्स १८’ हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सरावही पुण्यातच पार पडला होता.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *