facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / भिमाशंकर-पुणे मार्गावर अपघात, 2 जणांचा मृत्यू

भिमाशंकर-पुणे मार्गावर अपघात, 2 जणांचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे – भिमाशंकर-पुणे दरम्यान भाविकांच्या खासगी बसला अपघात झाला. गंभीर जखमींना पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर जखमींना घोडेगाव, मंचर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व भाविक ओडिशा येथील रहिवाशी आहेत. हे सर्व भाविक भिमाशंकर येथून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

हा अपघात रात्रीच्या सुमारास पोखरी घाटामध्ये रस्त्यावर बस पलटी झाल्यामुळे घडला. या अपघातामध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत.या अपघातात प्रफुल्लकुमार साहू व ममता मिश्रा जागीच ठार झाले. तर इतर 36 जण जखमी झाले आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *