facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / मेडिकलमधील चार व्हेंटिलेटर बिनकामाचे

मेडिकलमधील चार व्हेंटिलेटर बिनकामाचे

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर – 

श्वसनाचे विकार प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यात फुफ्फुसातील श्वसननलिकांवर विपरित परिणाम झालेले अनेक रुग्ण येत आहेत. न्यूमोनियाचा संसर्ग होत असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासते. वंशपंरपरा, अॅलर्जी, धूम्रपान, वायुप्रदूषण, मानसिक ताणतणाव संसर्ग यामुळे श्वसनाचे आजार होतात. वायुप्रदूषण थेट फुफ्फुसावर परिणाम करते. तर, सिगारेट किंवा विडीच्या धुरात चार हजार विषारी पदार्थ असतात. त्यात कार्बन मोनॉक्‍साइड, कर्ब, बेंझपायरीन याचा परिणाम थेट श्वसननलिकेवर होतो. फुफ्फुसातील वायुकोष व रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो आणि फुफ्फुसाची लवचिकता कमी होते, असे प्रदूषणामुळे दमाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. श्वसन विकारात दोन वर्षे वय असलेल्या मुलांची संख्या सहा टक्क्यांवर आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दम्याचे प्रमाण दुप्पट दिसून येते. महिलांमध्ये १.५ टक्के आहे, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण तीन टक्के आहे. थोडेसे कष्ट झाल्यानंतर श्‍वास लागत असेल तर श्वसनविकार असल्याचे स्पष्ट होते. यावर सुपर स्पेशालिटीमध्ये स्वतंत्र विभाग आहे. साठ खाटांच्या या विभागात खाटांच्या दहा टक्के व्हेंटिलेटर असावेत, असा नियम आहे. यानुसार सहा व्हेंटिलेटर या विभागाला देण्यात आले. सद्यस्थितीत हा वॉर्ड हाउसफुल्ल असतो. परंतु, येथील पाच व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. केवळ एका व्हेंटिलेटवर या विभागाचा श्वास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मेडिकलमधील अतिदक्षता विभागातीलही चार व्हेंटिलेटर कोमात गेले आहेत.

आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्वसनविकाराचे रुग्ण वाढत आहेत. याला आनुवंशिकतेसोबत प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. केवळ उपराजधानीचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के शहरवासी श्वसनविकाराच्या विळख्यात सापडले आहेत. लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. अशा स्थितीत, मेडिकलमधील अतिदक्षता विभागातील चार व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *