facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात घसरण

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव: 30 हजार रुपये प्रतितोळा मिळणारं सोनं प्रतितोळा थेट 34 हजारांपर्यंत पोहोचलं होतं.500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर गेले दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. 3 पण दोन दिवसाच्या धामधुमीनंतर आता सोन्याचे दर पुन्हा एकदा उतरले आहेत.

गेले दोन दिवस सोन्याचा व्यापार बराच तेजीत होता. मात्र, आता दोन दिवसानंतर जळगावमधील सराफ व्यापर पूर्णपणे थंडावला आहे. दोन दिवसापूर्वी जळगावमध्ये सोन्याचा भाव ३३ हजारापर्यंत गेला होता. मात्र आज सोन्याचा भाव घसरुन ३० हजारापर्यंत आला आहे.

दरम्यान, 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानं लोकांमधील घबराटीमुळे सोन्याचे दर वाढले होते. असं मत जाणकारांनी व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आयकर विभागनं ज्वेलर्सवर टाकलेल्या धाडसत्रानंतर सोन्याच्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली असल्याचंही बोललं जात आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *