facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / अकरा ११ वर्षांनंतर खुनाच्या आरोपीला अटक
accused-arrest-after-11-yea

अकरा ११ वर्षांनंतर खुनाच्या आरोपीला अटक

आवाज न्यूज नेटवर्क

बदलापूर – उधारीच्या पैशावरून बदलापूरमध्ये झालेल्या हत्याकांडाची उकल करण्यात तब्बल ११ वर्षांनंतर ठाणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट १ ने शनिवारी या हत्याकांडातील आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. आरोपीचा शोध घेण्यामध्ये गुन्हे शाखेतील पोलिस नाईक तानाजी गायकवाड यांची महत्वाची भूमिका होती. गुन्हा घडला तेव्हा ते बदलापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. बदली झाली तरी त्यांनी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवले होते.

२००५च्या सप्टेंबर महिन्यात बदलापूरमध्ये गुड्डू जयस्वाल याची दोन्ही हात बांधून डोक्यावर तसेच तोंडावर सळईने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले पोलिस नाईक तानाजी गायकवाड यांची शोधमोहीम सुरू होती. नंतर ते गुन्हे शाखेत आले तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. आरोपी अमरजित मुन्नीलाल जयस्वाल (३३) हा शनिवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच अमरजितला अटक करण्यात आली. गादी बनवण्याचे काम करणारा अमरजित पिंपरी-चिंचवड येथील वृंदावन कॉलनीमध्ये राहत होता. तसेच तो मूळचा आझमगढचा असून त्याने गुड्डूला १५ हजार रुपये उसने दिले होते. मात्र पैसे परत केले नाहीत, म्हणून आरोपीने गुड्डूची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *