facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / 500-1000 नोटांच्या बंदीनंतर पेटीएमच्या वापरात 435 टक्क्यानं वाढ
paytm

500-1000 नोटांच्या बंदीनंतर पेटीएमच्या वापरात 435 टक्क्यानं वाढ

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई:

पेटीएमचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) मधुरा देवडा यांनी सांगितलं की, काळा पैसा आणि नकली नोटा बाहेर काढण्यासाठी उचलण्यात आलेलं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आमचा देखील पाठिंबा आहे. व्यवहारासाठी पेटीएमचा जास्तीत जास्त वापर सध्या केला जात आहे. ‘

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापरात प्रचंड वाढ झाली आहे.

या निर्णयामुळे पेटीएमच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 435 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोटा रद्द झाल्याच्या घोषणेनंतर पेटीएमच्या वापरामध्ये तब्बल 250 टक्क्याने वाढ झाली. तर पेटीएमचं अॅप डाऊनलोड करण्याऱ्यांच्या संख्येत 250 टक्क्यांनी वाढ झाली.

दरम्यान, पेटीएमसोबतच ओला मनी, फ्री चार्ज आणि मोबिक्विक यांच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापरातही प्रचंड वाढ झाली आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *