facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / कचनेर यात्रेची धर्मध्वजवंदनाने सुरवात

कचनेर यात्रेची धर्मध्वजवंदनाने सुरवात

आवाज न्यूज नेटवर्क

ओरंगाबाद

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दक्षिणेतील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे रविवारपासून तीन दिवसांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.
आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव, आचार्य सचिदानंद गुरुदेव, मुनीश्री गिरनारसागरजी, आर्यिका कुलभूषणमती माताजी, आर्यिका विनम्र्रमती माताजी यांच्या प्रमुख सानिध्यात धर्मध्वजवंदन झाले. क्षेत्राचे अध्यक्ष व महाप्रसाददाता प्रमोदकुमार कासलीवाल, सुनीलकुमार पाटणी, मनोजकुमार सावजी परिवाराच्या वतीने ध्वजवंदन करून महोत्सवाची सुरवात झाली. क्षेत्राचे सचिव भरत ठोळे, माणिकचंद गंगवाल, अशोक गंगवाल, विपीन कासलीवाल, वृषभ गंगवाल यांच्यासह अनेक आदींची प्रमुख उपस्थिती होती. यात्रा महोत्सवासाठी उपस्थित भाविकांना प्रमोदकुमार जमनलाल कासलीवाल, सुनीलकुमार सुंदरलाल पाटणी, मनोजकुमार दुलीचंदसा सावजी परिवाराच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सकाळी कचनेरला भेट देऊन भगवंतांचे दर्शन घेतले.
प्रवीण लोहाडे व अशोक गंगवाल यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कासलीवाल यांनी बोलिया वाचन केले. तदनंतर बोलिया होऊन भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. क्षेत्राचे विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, ललित पाटणी, एम. आर. बडजाते, विनोद लोहाडे, डॉ. रमेश बडजाते, दिलीप काला, प्रकाश कासलीवाल, के. डी. पांडे, संतोष पाटणी आदींसह विश्वस्त व कार्यकारिणी मंडळाचे व यात्रा महोत्सवाचे सदस्य, कचनेरचे सरपंच, गावकरी यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती. ठिकठिकाणांहून पायी यात्रेकरूंच्या दिंड्याही क्षेत्रावर दाखल झाल्या आहेत. परभणी, हिंगोली, शिवूर, जालना, जिंतूर, मानवत, नांदेड, श्रीरामपूर, लासूर, औरंगाबाद, बजाजनगर,वाळूज आदी ठिकाणाहून आलेल्या पायी यात्रेकरूंच्या क्षेत्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. महोत्सवासाठी विश्श्वस्थ मंडळ, कार्यकारणी मंडळ, यात्रा समिती यांच्यासह शाळेचे शिक्षक वृंद, क्षेत्राचे कर्मचारी व कचनेर सरपंच, गावकरी विशेष पुढाकार घेत असल्याची माहिती क्षेत्राचे महामंत्री भरत ठोळे यांनी दिली असल्याचे यात्रा महोत्सवाचे प्रचार प्रसार नरेंद्र अजमेरा व पियूष कासलीवाल यांनी सांगितले दिली आहे.

आज मुख्य यात्रा महोत्सव

सोमवारी सकाळी दहा वाजता बोलिया होवून भगवंतांचा पंचामृत अभिषेक होईल. दुपारी तीन वाजता जलयात्रा पालखी व रथयात्रा मिरवणूक, सायंकाळी सातवाजता आरती, शास्त्र वाचन, स्वाध्याय व सायंकाळी साडेसात वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. भाविकांसाठी एस. टी. महामंडळाच्या वतीने शहागंज,सिडको बसस्टँड येथून दिवसभर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *