facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / जळगाव / डॉ. श्रीपाल सबनीसांकडून मोदींची पाठराखण

डॉ. श्रीपाल सबनीसांकडून मोदींची पाठराखण

 

आवाज न्यूज नेटवर्क

काळ्या पैशाच्या विरोधात पंतप्रधान मोदींनी एवढा चांगला निर्णय घेतला, पण काही राजकीय लोकांनी त्याचेदेखील भांडवल केले. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नाला राजकीय स्वार्थाच्या भुमिकेतून विरोध करण्याची भूमिका विरोधक घेत असतील, तर त्यांच्या राजकीय व्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे की, काय? अशी शंका येऊ लागते, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

रविवारी चाळीसगावला मसाप शाखांचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद््घाटक डॉ. श्रीपाल सबनीस होते. ते म्हणाले की, देशातील काळा पैसा हा काळ्या संस्कृतीला जन्म देत असतो. या पैशाचा संबंध हा केवळ आर्थिक नसतो. जीवनातील मूल्यव्यवस्था उद््ध्वस्त करण्याचे संहारक सामर्थ्य त्याच्यात असते. काळ्या पैशाच्या विरोधात पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला. त्याचा काही दिवस सामान्य माणसाला त्रास होईल. परंतु सामान्य माणूस मनानं मोठा आहे. तो समजून घेऊ शकतो. काही माणसं सोडली, तर राजकीय व्यवस्था ही भ्रष्टाचारात बुडालेली आहे. मोदींनी एवढा चांगला प्रयत्न केला. पण बाकीच्या राजकीय लोकांनी त्याचे भांडवल केले. भारतीय मानसिकता समृद्ध करायची असेल, तर देशाच्या प्रश्नांवर आपले ध्येय बदलावे लागेल आणि हा ध्येयवाद केवळ साहित्यिक विचारवंत व कलावंत यांच्याकडेच आहे, असेही डॉ. सबनीस म्हणाले.

मराठीला नोबेल का नाही?

गीतकाराला नोबेल पुरस्कार मिळाला. हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीनंतर भारताला नोबेल मिळालेच नाही. मग आमचे साहित्यिक व साहित्यिक संस्था या कुठे कमी पडतात यावर चिंतन झाले पाहिजे. संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आगरकर ही प्रचंड प्रतिभेची माणसं मराठीत होती, तरीही मराठीला ज्ञानपीठ पुरस्कारानंतर काहीच मिळाले नाही, असे सांगत डॉ. सबनीस यांनी खेद व्यक्त केला. अखिल भारतीय साहित्य संमेलन व हे घडविणारी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा इतिहास एकांगी जातीचा वा एकांगी वर्गाचा आता राहिलेला नाही. साहित्य परिषद बहुजनांपर्यंत नेली, दलितांच्या वेदनांपर्यंतही गेली. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या व मुस्लिमांच्या वेदनांपर्यत हा प्रवास पोहोचेल, असा विश्वास डॉ. सबनीस यांनी व्यक्त केला.

खऱ्या इस्लामचे प्रतिबिंब

खरा इस्लाम दहशतवादी, बगदादी आणि लष्कर-ए-तोयबाचा असू शकत नाही. पैगंबरसाहेबांचा इस्लाम हा शांततावादी, समतावादी व मानवतावादी आहे. खऱ्या इस्लामचे प्रतिबिंब केवळ दर्ग्यांच्या परंपरेमध्ये पडलं आहे आणि म्हणूनच हिंदू संस्कृतीने दर्गा संस्कृती आपलीशी केली. मंदिर संस्कृती व दर्गा संस्कृतीमध्ये असलेला संवादच देशाला एका सूत्रामध्ये बांधून ठेवण्यासाठी कारण ठरला. आजही तोच घागा आपल्याला महत्त्वाचा वाटत असल्याचे मत डॉ. श्रीपाल सबनीस चिंतन शिबिरात व्यक्त केले.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *