facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / भरधाव कार हॉटेलमध्ये घुसून एक ठार

भरधाव कार हॉटेलमध्ये घुसून एक ठार

नगर-औरंगाबाद हायवेवरील अकबरनगर येथे भरधाव वेगाने जाणारी कार गाडी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात एकाचा जागीचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. हे तिघे चहा पित असतानाच कारने त्यांना धडक दिली. कारमधील चालकासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यांचे नावे समजू शकलेली नाहीत. या अपघातानंतर येथील संतप्त नागरिकांनी काही वेळ रास्ता-रोको आंदोलन करून वाहतूक अडविली होती. रविवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघात नगरमधील कोठला भागातील भाईसाहब राजू मदारी (वय ३८) याचा जागीच मृत्यू झाला. त्याला कारने लांबपर्यंत फरफटत नेले. तर मजून समशेद मदारी, अल्ताफ मुरिया मदारी (रा. वैजापूर, औरंगाबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याच्यांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भाईसाहेब मदारी हे अकबरनगरला मजुरी निमित्त गेले होते. त्यावेळी वैजापूर येथील दोन पाहुणे त्यांच्याकडे आले. त्यामुळे हे तिघे पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेले होते. हॉटेलसमोर बाकड्यावर बसून ते सर्व तिघे चहा घेत असताना नगरकडून औरंगाबादकडे जात असलेली कार (एमच २१ के. ३८८) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बोलेरो जीप धडकून हॉटेलच्या बाकड्याला धडकली. पुढे एका भिंतीला जाऊन धडकली. बाकड्यावर बसलेले मदारी हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघा जण गंभीर जखमी झाले. या दोघांना नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यात दोन मोटारसायलकचे नुकसान झाले. तर कारमधील दोन महिला, चालक हे जखमी झाले आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु त्याचे नावे समजू शकली नाहीत.
अपघाताची माहिती समजताना नागरिकांना नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन सुरू केले. सुमारे अर्धातासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. काही वेळ तणाव निर्माण झाल्याने अपघात स्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, वाहतूक शाखेचे निरीक्षक अजित लकडे व इतर कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरुळीत केली.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *