facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर / ​शेतकरी आत्महत्या सुरूच

​शेतकरी आत्महत्या सुरूच

गेल्या तीन वर्षांपेक्षा यंदा शंभर टक्के पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडता येत नसल्याने ते आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यातील १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली आहे. त्यातही गेल्या पाच महिन्यात ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळी तालुक्याबरोबरच बागायती तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. चांगल्या पावसामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असे वाटत असताना आत्महत्या वाढू लागल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांत यंदा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या वर्षात पाणी टंचाईमुळे पिके न आल्याने सावकारी कर्ज, बँकेकडून कर्ज घेतल्याने उन्हाळ्यातील पाच महिन्यांत ६४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने खरिपाची पिके चांगली आली आहेत. तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असून, गेल्या पाच महिन्यांत विष घेऊन, गळफास घेऊन ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात तरुण शेतकऱ्यांबरोबर वृध्द शेतकरीही आहेत. ऐन जून महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यांत बारा शेतकऱ्यांनी, ऑक्टोबर महिन्यांत दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पाथर्डी, कर्जत, जामखेड या दुष्काळी तालुक्यांबरोबरच श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा या बागायती भागात शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गेल्या चार वर्षांत या वर्षात सर्वाधिक १२४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, गेल्या वर्षी ११८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे होती.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या वारसांना सामाजिक संस्थांकडून मदत केली जात होती. परंतु आता पावसाळ्यानंतरही या आत्महत्या कमी होऊ शकलेल्या नाहीत. सरकारी यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत दिल्यानंतर इतर उपाययोजना केल्या जात नाहीत.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *