facebook
Sunday , December 11 2016
Home / नागपूर / आता खासगी रुग्णालयांना स्वीकारावे लागणार धनादेश
hos

आता खासगी रुग्णालयांना स्वीकारावे लागणार धनादेश

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर

चलनातून ५०० व एक हजाराच्या नोटा काढून घेण्यात आल्यानंतर व नव्या नोटांची कमतरता भासत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, रविवारी राज्यभरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले. राज्यातील सर्व खाजगी रूग्णालयांनी तातडीच्या उपचाराप्रंसगी रुग्णांकडून धनादेश स्वीकारण्याचे आदेश फडणवीस यांनी रविवारी दिले.

बँकांमधून अजूनही नागरिकांना पुरेसा निधी काढण्याची सवलत नसल्याने अनेक सेवांना याचा फटका बसला आहे. यात सर्वाधिक हाल खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांचे होत आहेत. खासगी रुग्णालय जुन्या नोटा स्वीकारत नसून धनादेश व इतर माध्यमातून पेमेंट घेत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वाढता असंतोष बघता राज्य सरकारने रविवारी हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, या निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सनियंत्रण केले जाणार आहे. रुग्णांना खाजगी रूग्णालयाकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संबधीत रूग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाइल क्रंमाक घ्यावा जेणेकरून त्यांना धनादेश स्वीकारण्याबाबत मदत होईल. त्याचबरोबर एखाद्या रूग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयास दहा हजार रूपयांपर्यंतचा दिलेला धनादेश न वटल्यास या धनादेशाची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Check Also

results

परीक्षेनंतर तीस ‌दिवसांत निकाल लागणार

विद्यापीठाच्या प‌रीक्षा सध्या केव्हाही जाहीर केल्या जातात. त्यांचे निकालही वेळेवर लागत नाहीत. परंतु, यापुढे परीक्षेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *