facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / जमा झालेल्या काळ्या पैशावर मोठा दंड
03-1435920133-black-money-l

जमा झालेल्या काळ्या पैशावर मोठा दंड

आवाज न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – बरेच नागरीक आता जून्या 500 आणि 1000 रूपयाच्या नोटा बॅंकेत जमा करीत आहेत. मात्र त्याबाबातचे जर स्पष्टीकरण अयोग्य असेल तर त्यावर 200 टक्के इतका दंड लागू शकतो असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. ही कारवाई प्राप्तीकर विवरण भरण्याच्या अगोदरही होऊ शकते. त्यामुळे काळा पैसा निर्मीतीला पायबंद बसेल.
बऱ्याच निष्क्रीय जनधन खात्यात आता पैसे भरले जात आहेत. ते जर अयोग्य पैसे असलतील तर त्यावरही 200 टक्के इतका कर लागणार असल्याचे सांगण्यात आले. सरकाराने या नोटावर बंदी घातल्यानंतर नागरीकांना त्या नोटा बॅंकात 30 डिसेंबरपर्यंत जमा करण्यास सांगीतले आहे.
त्यानंतर काही लोक त्यांचा काळा बैसा इतरांच्या खात्यात जमा करण्याच प्रयत्न करित आहेत. तसा पैसा जनधन खात्यातही जमा होत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष आहे. जर या खात्यातील पैसा चूकीच्या मार्गाने आला असेल तर त्यावर 200 टक्के दंड लागू शकतो असे सरकारने म्हटले आहे. मात्र जर योग्य पध्दतीने कमाई केलेले पैसे असतील तर त्या पैशावर 2.5 लाख रूपयापर्यंत कर लागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असे सांगण्यात आले.
कायद्यात दुरूस्तीची गरज नाही
दरम्यान सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार असा दंड केला जाऊ शकणार नाही. त्यासाठी कायद्यात पुर्वलक्षी प्रभावाने दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे मत काही विष्लेशकांनी व्यक्त केले आहे. तश्‍या सूचना अर्थमंत्रालयाकडेही गेल्या आहेत. मात्र दंडाची कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्यीा गरज नसल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर शेतीमधील उत्पन्न कायद्याच्या कक्षेबाहेर राहणार असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *