facebook
Thursday , December 8 2016
Home / जळगाव / जादा खिडकीसाठी पोस्टाची तोडफोड
post-office

जादा खिडकीसाठी पोस्टाची तोडफोड

भुसावळ शहरातील मॉर्डन रोडवरील मोठ्या पोस्टात नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालत जुन्या इमारतीमधील खिडक्यांच्या काचा फोडण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

शनिवारी सकाळी पोस्ट ऑफिस उघडण्यापूर्वीच नागरिकांनी खात्यात पैसे भरण्यासाठी आणि मोठ्या नोटा बदलून घेण्यासाठी रांग लावून गर्दी केली होती. केवळ दोन खिडक्यांवर नोटा बदलून देण्याचे काम होत असल्याने संतप्त नागरिकांनी गोंधळ घालत आणखी काही खिडक्यांवर नोटा बदलविण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी केली. काहींनी जुन्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली. भुसावळच्या मुख्य पोस्ट ऑफिसला स्टेट बँकेकडून ४० लाख रुपये दिले जात आहेत. यातून उपपोस्ट कार्यालय मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव, फैजपूर, सावदा, बोदवडसह ३४ उपकार्यालयात रक्कम पाठविण्यात येते. मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये १६ लाख रुपये वितरणासाठी ठेवले जातात. रक्कम कमी असल्याने जादा खिडकी उघडता येत नसल्याने पोस्ट ऑफिसच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या मर्यादा समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोस्ट मास्तर बी. आर. वानखेडे यांनी केले आहे.

Check Also

आदिवासी तडवी समाजाचा मोर्चा

तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी मुबारक तडवी हा जळगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकत होता. तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *