facebook
Monday , December 5 2016
Home / नागपूर / नागपुरात पावणेदोन कोटींची रोकड जप्त
nagpur-raid

नागपुरात पावणेदोन कोटींची रोकड जप्त

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर

हिलटॉप येथील अॅडव्होकेट सोसायटीत एका फ्लॅटमध्ये पावणेदोन कोटी रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या रक्कमेत चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ही रक्कम घेवून चौघेही सीए अग्रवाल यांच्याकडे जाणार होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अॅडव्होकेट सोसायटीत चार संशयित व्यक्ती कोट्यवधी रुपये घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना एका बॅगमध्ये १ कोटी ८७ लाख रुपये आढळून आले.

या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून हा पैसा कुणासाठी आणला होता, याची चौकशी सुरू आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश बोराटे, एपीआय एस. एस. सुरोसे, पीएसआय पी. आर. पाटणकर, हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम नाकट, शिपाई रामाशीष यादव, योगेश हरणे, सुरेश तालेवार, बलजीतसिगं ठाकूर यांनी छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. चौघे कोणाकडे आले होते याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

Check Also

news-13

उपराजधानी होतेय कॅशलेस

आवाज न्यूज नेटवर्क – नागपूर – देशातील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक व्हावे, यासाठी ‘कॅशलेस भारत’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *