facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पाकचे ७ जवान ठार ,इंडिअन आर्मीचा धमाका !
indian-army

पाकचे ७ जवान ठार ,इंडिअन आर्मीचा धमाका !

आवाज न्यूज नेटवर्क

श्रीनगर :

पाकिस्ताननेही त्यांचे सात जवान गेल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता त्यांनी गरळ ओकत भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा सुरु केला आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या मते, पाकिस्तानचे सात जवान मारले गेले आहेत. पाकिस्तानी एजन्सी आयएसपीआरने हे वृत्त दिलं आहे.  मात्र हे वृत्त देताना भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची पुष्टी पाक मीडियाने जोडली आहे.

देशभरात लोक नोटा मोजण्यात व्यस्त असताना, तिकडे सीमेवर भारतीय जवानांनी धमाका केला. जवानांनी पाकिस्तानच्या एक-दोन नव्हे तर सात जवानांना टिपून मारलं आहे.

मात्र गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानने स्वत:च शस्त्रसंधीचं शेकडोवेळा उल्लंघन केलं आहे. पण पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही तितक्याच ताकदीने उत्तर दिलं आहे.

भारताने सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करुन, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकने सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाककडून सातत्याने होणाऱ्या गोळीबारात भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. मात्र भारतीय जवानही चोख कामगिरी करत, त्याचा बदला घेत आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *