facebook
Saturday , December 10 2016
Home / नाशिक / पेट्रोल भरा पाचशे, हजारचेच!
petrol

पेट्रोल भरा पाचशे, हजारचेच!

आवाज न्यूज नेटवर्क

नाशिक

मंगळवारी रात्री पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. शहरातील सगळ्याच पेट्रोलपंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या. मात्र, पेट्रोलपंपचालकांनी सध्या नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे. पेट्रोल भरायचे असेल तर पाचशे रुपयांचेच भरा, नाही तर भरूच नका असा पवित्रा पेट्रोलपंपचालकांनी घेतला असून, यात सामान्य नागरिक भरडले जात आहेत.

पाचशे आणि हजारच्या नोटा रुग्णालय, पेट्रोलपंप यांसारख्या ठिकाणी वापरण्यास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊनही पेट्रोलपंपावर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास साफ नकार दिला जात आहे. पेट्रोल घ्यायचे तर पाचशेचेच घ्या; अन्यथा घेऊ नका, अशा पेट्रोलपंपचालकांच्या पवित्र्यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरले जात असून, मजूर, कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
१०० च्या नोटा गायब?

अनेक पेट्रोलपंपचालक मुद्दाम ही परिस्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शंभराच्या नोटा पंपचालक कामगारांकडून काढून घेऊन मुद्दाम शंभराच्या नोटांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचशेच्या बदल्यात शंभराच्या नोटा कमिशन घेऊन देण्याचे प्रकारही सुरू असून, नेमक्या १००, ५० च्या नोटा जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभराच्या नोटा जमा करा

पेट्रोल विक्रीदरम्यान जमा होणाऱ्या शंभराच्या नोटा ग्राहकांना देण्याऐवजी लगेचच कार्यालयात जमा करा, असे फर्मानच काही पेट्रोलपंप मालकांनी कर्मचाऱ्यांना सोडल्याने नोटांच्या तुटवड्यात भरच पडते आहे. बाजारपेठेत शंभराच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, बँका आणि एटीएम सेंटर्सवर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते आहे.

Check Also

अनियमित ऑडिटमुळे ब्लॅक मनी वाढला

दीर्घकालीन सत्तेत राहताना राज्यात अनेक मंत्र्यांनी स्वत:सह नातेवाईक आणि मर्जीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या नावे शिक्षण संस्था …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *