facebook
Sunday , December 4 2016
Home / औरंगाबाद / शरियत कायद्यानुसारच वागणार
ijtema

शरियत कायद्यानुसारच वागणार

आवाज न्यूज नेटवर्क

ओरंगाबाद

देशात सर्वांना आपल्या धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. राज्य घटनेप्रमाणे तो अधिकार इस्लाम धर्म मानणाऱ्यांनाही आहे. आम्ही इस्लाम धर्माच्या तत्वानुसार शरियत कायद्याप्रमाणे वागणार असल्याचा ठराव या प‌रिषदेत घेण्यात अाला.
वहदते इस्लामी हिंदतर्फे देशभर १३ नोंव्हेबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत चालणाऱ्या ‘अल्लाहसे नाता जोडो’ या मोहिमेचे प्रारंभ रविवारी करण्यात आला. वहिदत ए इस्लामच्या इज्तेमाचे आयोजन आमखास मैदानावर करण्यात आले. या परिषदेत मान्यवरांच्या भाषणानंतर पाच ठराव मंजूर करण्यात आले.
शरियतनुसार चालणार, यामध्ये बदल करण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही प्रतिकार करू, मुस्लिम, दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध, शिक्षणाचे भगवेकरण चालणार नाही, देशातील सर्व वर्गांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, यांचा त्यात समावेश आहे. आम्ही इस्लाम धर्मातील परंपरेनुसार वागणार, असाही ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

धर्माच्या बदनामीचे कारस्थान

वहिदत ए इस्लामचे अध्यक्ष मौलाना अताउर्ररहमान वजदी यांनी सां‌गितले की, ‘जगात इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कट आहे. आम्ही शरियत नुसारच आम्ही वागणार. त्यात कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही.’ या परिषदेत विविध मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले.

Check Also

news-13

ऑरिकमधील प्लॉटसाठी ८७१ जणांची नोंदणी

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये (ऑरिक) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *