facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / आता पैसा पोचणार विमानातुन !

आता पैसा पोचणार विमानातुन !

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई-

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या प्रेसमधून छापलेल्या नोटा देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जाणार आहे. सर्व बॅंकांमध्ये पुरेसे पैसे पाठवण्यासाठी एअरफोर्सचं ग्लोब मास्टर या विमानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी 5 ग्लोबमास्टर मालवाहू विमानांची मदत घेतली जाणार आहे. आरबीआयच्या म्हैसूर प्रिंटिंग प्रेसमधून ही विमाने त्या-त्या क्षेत्रात पैसे पाठवणार आहेत. याशिवाय 3 ग्लोबमास्टर विमानाद्वारे नागपूर क्षेत्रातही पैसे पाठवण्यात येतील. सरकारच्या या निर्णयामुळे पुढील दोन दिवसात बॅंकांतील चलनाचा तुटवडा दूर होण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती एका संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

केंद्र सरकारन 500 आणि हजारच्या नोटा रद्द केल्यामुळे त्यांचा मोठ्याप्रमाणत तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नोटांचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. आता नागरिकांपर्यंत नोटा पोहोचवण्यासाठी सरकार वायूदलाची मदत घेणार आहे.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *