facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / एका मोदीचा निर्णय १२५ कोटी लोकांच्या अंगावर – उद्धव ठाकरे

एका मोदीचा निर्णय १२५ कोटी लोकांच्या अंगावर – उद्धव ठाकरे

 • मुंबई- 
  देशातील १२५ कोटी जनता पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा भोगत आहे. राष्ट्रभक्तीची शिक्षा फक्त जनताच भोगत असते व देशासाठी त्यागही फक्त जनताच करीत असते असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या निर्णयानंतर विरोधक आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतील असे मोदी सांगत असले तरी, पंतप्रधान मोदी हे जगातील अभेद्य अशा सुरक्षा व्यवस्थेत आहेत व ही सुरक्षा व्यवस्था भेदून डासही त्यांना चावू शकत नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे.
  ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर शिवसेनेकडून सातत्याने आगपाखड सुरु असून आजही सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य नागरीक देशहिताची किंमत मोजतायत त्यासाठी पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची अजिबात गरज नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.
  दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना देशासाठी घेतलेल्या निर्णयाची किंमत प्राणांचे मोल देऊन चुकवावी लागली. मोदींनी फक्त नोटाच बदलल्या आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे.
  काय म्हटले आहे अग्रलेखात 
  – पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावुक वगैरे होऊन सांगितले आहे की, देशातून भ्रष्टाचार साफ करण्यासाठी मला आणखी ५० दिवस द्या. सर्व सफाई झाली नाही तर भरचौकात उभे करून मला शिक्षा द्या! पंतप्रधानांना असे काही करण्याची अजिबात गरज नाही. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा देशातील १२५ कोटी जनता भोगत आहे तेवढी पुरेशी आहे. राष्ट्रभक्तीची शिक्षा फक्त जनताच भोगत असते व देशासाठी त्यागही फक्त जनताच करीत असते.
   – नोटा बदलणे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला नाही किंवा हाफीज सईदला फरफटत आणून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर फासावर लटकवणे नाही. त्यामुळे सध्या तरी दहशतवाद्यांकडून कुणालाच भीती नाही. भीती आहे ती सामान्य नागरिकांना. देशहिताची किंमत मोजत आहेत ते सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य लोक. पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करून घेण्याची अजिबात गरज नाही. मरोत मोदींचे दुश्मन. मोदींना आणखी शंभर वर्षे ठणठणीत आरोग्याचे आयुष्य लाभो अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करीत आहोत.
   – पंतप्रधान हे बेडर आणि निडर आहेत, तरीही त्यांनी असे सांगितले आहे की, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराबाबत कठोर निर्णय घेतल्यामुळे विरोधक आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतील, संपवण्याचा प्रयत्न करतील. छे, छे, असे काहीच घडणार नाही. मरोत मोदींचे दुश्मन. मोदींना आणखी शंभर वर्षे ठणठणीत आरोग्याचे आयुष्य लाभो अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करीत आहोत. पंतप्रधान मोदी हे जगातील अभेद्य अशा सुरक्षा व्यवस्थेत आहेत व ही सुरक्षा व्यवस्था भेदून डासही त्यांना चावू शकत नाही, हे काय देशवासीयांना माहीत नाही!
   – नोटा बदलणे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला नाही किंवा हाफीज सईदला फरफटत आणून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर फासावर लटकवणे नाही. त्यामुळे सध्या तरी दहशतवाद्यांकडून कुणालाच भीती नाही. भीती आहे ती सामान्य नागरिकांना. देशहिताची किंमत मोजत आहेत ते सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य लोक. पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करून घेण्याची अजिबात गरज नाही व लोकांना होणारा त्रास सरकारने फारसा मनास लावून घेण्याची गरज नाही.
   – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बँकांच्या बाहेर चेंगराचेंगरी, हाणामार्‍या झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. नशीब इतकेच की, जनता संयमी आहे. त्यामुळे पोलिसांना फक्त सौम्य लाठीमार करावा लागला. कुठे इस्पितळात रुग्ण दगावले, कुठे महिलावर्ग, वृद्ध रांगेत मूर्च्छा येऊन पडले. हे सर्व सहन करण्याइतकी आपली जनता शांत, संयमी असल्याने पंतप्रधानांनी स्वत:च्या जीविताची काळजी करू नये. हजारो देशभक्तांनी कोणताही गाजावाजा न करता फासाचा दोर हसत हसत मानेभोवती लपेटून घेतला व त्यामुळेच देश आज टिकून आहे. देशासाठी बलिदान करण्याची वेळ आलीच तर आजही लाखो तरुण डोक्यास कफन बांधून रस्त्यावर उतरतील व देशाच्या दुश्मनांचे गळे चिरायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.

  – बलिदान दिले ते असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांनी. खलिस्तान्यांना खतम करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात सरळ सैन्य घुसवून देशद्रोह्यांशी युद्ध पुकारले. त्याची किंमत प्राणांचे मोल देऊन इंदिरा गांधी यांना चुकवावी लागली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शीख सुरक्षा रक्षकांनीच त्यांना गोळ्या घातल्या. राजीव गांधींचा श्रीलंकेत शांती सैन्य पाठविण्याचा निर्णय वादग्रस्त असेलही, पण देशासाठी घेतलेल्या निर्णयाची किंमत राजीव गांधींना प्राणाचे मोल देऊनच चुकवावी लागली. मोदी यांनी फक्त नोटाच बदलल्या आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *