facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / बोर्डाच्या परीक्षेच्या फॉर्म पहिला भरा ,पैसे नंतर द्या : शिक्षणमंत्री

बोर्डाच्या परीक्षेच्या फॉर्म पहिला भरा ,पैसे नंतर द्या : शिक्षणमंत्री

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई:

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे, परीक्षा फी भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याबाबतची तक्रार बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.

दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा फॉर्म भरावा, पैसे भरण्याची मुदत आम्ही वाढवू, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरावा, पैसे भरण्याची मुदत राज्य सरकारच्या मदतीने वाढवून देणार आहोत, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणीमुळे बसता येणार नाही असं होणार नाही, असं सांगण्यात आलं.

त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देताना, शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा निर्णय आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *