facebook
Thursday , December 8 2016
Home / देश / विदेश / नरेंद्र मोदी यांच्यावर अरविंद केजरीवालने केले अनेक गंभीर आरोप !
kejriwal1-580x395

नरेंद्र मोदी यांच्यावर अरविंद केजरीवालने केले अनेक गंभीर आरोप !

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता काळा पैसा, बनावट चलन रोखण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. मात्र बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राजकारण जोरदार तापलं आहे.

दिल्ली विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर अनेक गंभीर आरोप केले. नोटबंदीमुळे दिल्लीत दहशतीचं वातावरण असून हा मोदी सरकारने गरिबांवर केलेला वार असल्याचं  केजरीवाल म्हणाले.

याशिवाय 2012 साली बिर्लाने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदींना पैसे दिल्याचाही आरोप केजरीवालांनी केला आहे. दिल्ली विधानसभेत नोटबंदीच्या मुद्द्यावरुन जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.

जुन्या नोटा सध्या पेट्रोल पंप, रुग्णालये, दूध केंद्र, सरकारी कार्यालये, विमानतळ, रेल्वे स्थानक अशा जीवनावश्यक ठिकाणीच चालत आहेत. या ठिकाणी 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा चालणार आहेत.

केजरीवालांच्या आरोपादरम्यान भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी गोंधळ घातल्याने त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितलं. श्रीमंत लोक मोदींचे मित्र असून विजय मल्ल्यांना 8 हजार कोटी देऊन परदेशात पळवल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

Check Also

kejriwal

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *