facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / नोट बंदीचा फटका मराठाक्रांती मोर्च्याला पण !
buldana-maratha-morcha-32-768x432-580x338

नोट बंदीचा फटका मराठाक्रांती मोर्च्याला पण !

आवाज न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:

राज्यातील बहुतेक जिल्ह्यात मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. गेल्या दोन महिन्यांपासून विराट संख्येने हे मोर्चे निघत आहेत. नुकतंच मुंबईत मराठा मोर्चाची बाईक रॅली झाली. यावेळीही मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठा मूक मोर्चाला आता नोटबंदीचा फटका बसला आहे. कारण राजधानी दिल्लीतील 20 नोव्हेंबरचा मराठा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना तात्काळ फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.

याबाबतचा निर्णय नुकताच आयोजकांनी घेतला आहे. मात्र दिल्लीतील मोर्चाची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

त्यानंतर राजधानी दिल्लीतही मराठा मोर्चा 20 नोव्हेंबरला धडक देणार होता, मात्र आता नोटाबंदीमुळे या मोर्चाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *