facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / उस्मानाबादेतून पावणेदोन कोटी व ९१ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

उस्मानाबादेतून पावणेदोन कोटी व ९१ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

आवाज न्यूज लाईन

उस्मानाबाद-

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-चौरस्ता येथे निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सुमारे ९१ लाख रूपयांची रक्कम घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीसह सुमो ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेचे स्टिकर या सुमो गाडीवर लावलेला होता. संशयावरून भरारी पथकाने ही सुमो थांबवली असता त्यात चलनातून बाद झालेल्या हजार रूपयांच्या नोटांचे मोठे पुडके दिसून आले. याची किंमती ९१ लाख ५० हजार रूपये इतकी असल्याचे समजते. तर दुसरीकडे उस्मानाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालयाजवळ एक कोटी ८५ लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.
खुद्द सहकार मंत्र्यांच्या लोकमंगल समूहाचीच ही गाडी असल्यामुळे जिल्ह्यात यावर चर्चा रंगली आहे. तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संशयास्पद दिसणाऱ्या सर्व वाहनांची या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. यात हे वाहन सापडले. जर ही रक्कम बँकेची असेल तर याबरोबर आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यकता होते. परंतु सुमो चालकाकडे असे कोणतेही कागदपत्रे नव्हते.
विशेष म्हणजे सोमवारी पहाटेच्या सुमारास वाहनांची तपासणी करताना परभणीहून सांगलीकडे जाणाऱ्या एका जीपमधून पाचशे, हजार रूपयांच्या नोटांची पोत्यात बांधलेली सहा कोटींची रोकड निवडणूक विभागाच्या पथकाने पकडली होती.
उस्मानाबादमार्ग सांगली अर्बन को. बँकेचे नाव टाकलेली पांढऱ्या रंगाची जीप (एमएच १० बीएम ३१२७) ही सोलापूर रस्त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने अडवली असता त्यात पाचशे, हजार रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या सहा कोटी रूपये किंमतीच्या नोटा आढळून आल्या. या नोटा सांगली अर्बन को. ऑप बँकेच्या असून पूर्णा व परभणी शाखेत जमा झालेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा सांगली येथील मुख्य शाखेत नेण्यात येत असल्याचे जीपमधील व्यक्तींनी सांगितले होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *