facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / नोटा मंदीमुळे हॉटेल्स, बार व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम

नोटा मंदीमुळे हॉटेल्स, बार व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम

भाईंदर-

गावात दारु बंदी करण्यासाठी किमान ५० टक्के मतदान आवश्यक ठरत असले तरी यंदा जुन्या हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने मद्यपींकडुनच बार व वाईन शासॅप्समधील बाटली आडवी झाली कि काय, असा प्रश्न सध्या चालकांना पडु लागला आहे. बाहेरुन येणारे पर्यटक व्यावसायिकांनी काही दिवसांपुर्वीच बुकींग केलेली हॉटेल्स व लॉज ग्राहकांकडुन बुकींग रद्द झाल्याने ओस पडली आहेत. सरकारने नोटा रद्द करण्यापुर्वी पुरेशी व्यवस्था करुन ठेवणे अपेक्षित असतानाही निर्मान झालेली कृत्रिम चलन मंदीचा फटका या व्यवसायांना बसु लागला आहे. नोटा रद्दचा निर्णय जाहिर झाल्यानंतर परिस्थिती ठिक होती. परंतु, सरकारने सर्व व्यावसायिकांना जुन्या नोटा स्विकारण्यास मनाई केल्याने कृत्रिम आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे. यामुळे हे व्यवसाय डबघाईला आल्याने त्यातील कामगारांना वेतन कसे द्यायचे, असा प्रश्न सध्या चालकांना पडला आहे. त्यातच काही धनदांडग्यांनी आपले काळे धन वटविण्यासाठी कामगारांना दोन ते तीन महिन्यांचे वेतन दिल्याचे बोलले जात असले तरी बार व वाईन शॉप्समधील कामगारांना तसे कोणतेही वेतन देण्यात आले नसल्याचा दावा त्यांच्या संघटनांकडुन करण्यात येत आहे. हि कृत्रिम आर्थिक चणचण त्वरीत दूर न झाल्यास आर्थिक व्यवस्था सुरुळीत होईपर्यंत एकतर कामगारांची कपात करावी लागणार. अथवा काही काळापुरता हे व्यवसाय बंद करावे लागणार असल्याचे संकेत सॅलियन यांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले, हजार, पाचशेच्या नोटा रद्द केल्याने उद्भवलेल्या प्रचंड चलन मंदीचा परिणाम सर्वच व्यवसायावर होत असला तरी वरील व्यवसायांना त्याचा सर्वाििधक फटका बसत आहे. काळे धन व भ्रष्टाचार संपविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो त्या क्षेत्रापर्यंत मर्यादित असणे अपेक्षित होते. यात मात्र सर्वचजण भरडले जात आहेत. हि परिस्थिती लवकर सुधारणे अपेक्षित असुन तसे न झाल्यास

देशभर आंदोलने उभी राहण्याची शक्यता आहे.

देशभरात हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने कृत्रिम चलन मंदी निर्माण झाल्याने त्याचा ७० टक्यांहुन अधिक परिणाम हॉटेल, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट, लॉजिंग व वाईन शॉप्सच्या व्यवसायावर झाल्याचे महाराष्ट्र राज्य हॉटेल्स असोशिएशनचे संयुक्त सचिव दुर्गाप्रसाद सॅलियन यांनी सांगितले आहे.

देशभरातील हॉटेल्स, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट व वाईन शॉप्समध्ये केंद्र सरकारने रद्द केलेल्या जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्विकारणे बंद झाले आहे. त्यातच नव्याने चलनात दाखल झालेल्या दोन हजारांच्या नोटा सुट्या पैशांअभावी स्विकारण्यात येत नाहीत. यावर पर्याय म्हणुन डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर करण्याचा निर्णय घेतला तरी तुर्तास पैशांचा वापर ) मर्यादित केल्याने तेसुद्धा वापरणे कठी झाल्याने पुरेशा ग्राहकांअभावी वरील व्यवसायाची ठिकाणे ओस पडली आहेत.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *