facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / रामायण मध्ये विभीषण ची भूमिका करणारे मुकेश रावल यांचा मृत्यु

रामायण मध्ये विभीषण ची भूमिका करणारे मुकेश रावल यांचा मृत्यु

आवाज न्यूज लाईन

मुंबई:

कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता हा आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह आढळला आहे. रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 

मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले होते, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. कुटुंबीयांना मुकेश रावल यांचा मृत्यू झाल्याची बातमी आज समजली.

मुकेश रावल हे काल घरातून बाहेर गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली, त्यावेळी फोटो दाखवून पोलिसांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *