facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पुण्यातील दोन बेपत्ता शाळकरी मुलींचा मृतदेह आढळला कालव्यात
index

पुण्यातील दोन बेपत्ता शाळकरी मुलींचा मृतदेह आढळला कालव्यात

आवाज न्यूज लाईन

पुणे- हडपसर भागातून मंगळवारी बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचे मृतदेह कालव्यात सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. कालव्यालगत असलेल्या छोट्या पाईपवरून दररोज शाळेत जाणाऱ्या या मुलींचा पाय घसरून त्या कालव्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विद्या कुमार बद्रे (वय १३, रा. मांजरी फाटा, बिराजदार रस्ता, हडपसर) आणि वैष्णवी संतोष बिराजदार (वय १३) अशी कालव्यात मृतावस्थेत सापडलेल्या मुलींची नावे आहेत. विद्या आणि वैष्णवी या हडपसर येथील ज्ञानप्रबोधनी विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होत्या. शाळेत एका संस्थेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गासाठी विद्या, वैष्णवी मंगळवारी सकाळी निघाल्या होत्या. वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना भोजन दिले जाते. त्यामुळे दोघी सकाळी घरातून काही न खाता बाहेर पडल्या होत्या. साडेसतरानळी भागातील कालव्यालगत असलेल्या पाईपवरून त्या कालवा पार करायच्या. सायंकाळपर्यंत दोघी घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे त्या बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार दिली. पालकांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
पोलिसांनी बुधवारी सकाळी कालव्यालगत पाहणी केली, तेव्हा विद्याचा मृतदेह कालव्यात आढळून आला. वैष्णवीचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. अग्निशमन दलाकडून कालव्याची पाहणी करण्यात आली. दुपारी तिचा मृतदेह त्याच कालव्यात सापडला. साडेसतरा नळी भागातील नागरिक कालवा ओलांडण्यासाठी सहा इंची पाईपचा वापर करतात. पाईपवरून कालवा ओलांडताना विद्या आणि वैष्णवी घसरून कालव्यात पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *