facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / मोदींचा कडक निर्णय – नाना पाटेकर
2016-11-16nananpatekar_ns

मोदींचा कडक निर्णय – नाना पाटेकर

आवाज न्यूज लाईन
नवी दिल्ली-
काळ्या पैशा विरोधातील मोहिम तीव्र करत व्यवहारातून ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. आठवड्याभरातनंतरही सोशल मीडियावरही हा मुद्दा सध्या भलताच चर्चेत असून अमिताभ बच्चन, अभिनेत्री अनुष्का शर्मा, हुमा कुरेशी, परेश रावल, सुनील शेट्टी, मधुर भांडारकर, विराट कोहली, अनिल कुंबळे यासारख्या अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. त्यात आता नाना पाटेकरांच्या नावाचीही भर पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला कडक निर्णय देशातील प्रामाणिक जनतेसाठी मात्र गोड असल्याचे सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नोटबंदीचे स्वागत करत मोदींचे कौतुक केले. तसेच ‘ इतक्या वर्षांपासून आपण इतकं काही सहन केलं आहे, मग आता देशासाठी १०-२० दिवस त्रास सहन करू शकत नाही का? असा सवालही त्यांनी विचारला. नुकतीच त्यांनी जम्मू-काश्मीर येथील कठुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *