facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘टीडीआर’ घोटाळ्याची कागदपत्रे ताब्यात

‘टीडीआर’ घोटाळ्याची कागदपत्रे ताब्यात

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – मंजूरपुरा टीडीआर घोटाळ्याची कागदपत्रे महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी पोलिसांच्या ताब्यात दिली. ‘आता गुन्हा दाखल करा,’ अशी विनंतीही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली.
मंजूरपुरा येथील नगरभूमापन क्रमांक ७६६१ मधील १५ मीटर रुंद रस्त्यासाठी १९९७ मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादनाचा मोबदला देखील त्यावेळी देण्यात आला. त्यानंतर अर्जदार खतीजा बेगम अब्दुल साजेद यांच्यातर्फे ‘जीपीए’धारक (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांनी त्याच जागेच्या ‘टीडीआर’ची मागणी केली. हे प्रकरण ‘मटा’ने चव्हाट्यावर आणले होते. यासंदर्भात हामेद मिर्झा, किशोर राजपूत, शेख हबीब शेख चांद व गजानन बारवाल यांनी आक्षेप दाखल केला. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लेखा विभागाकडून मोबदला देण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती मागवली. भूसंपादनापोटी ३१ मार्च १९९७ रोजी ८ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व घटनांचा उल्लेख करून महापालिकेच्या प्रशासनाने अब्दुल सिकंदर साजेद यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिली होती. तक्रार दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत होते.

पडसाद उमटले, पोलिस तक्रार दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. या संदर्भात ‘मटा’ प्रतिनिधीने सिटीचौक पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा ‘महापालिकेने फक्त तक्रार दाखल केली आहे, पुरक कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे कागदपत्रांची छाननी करून आवश्यक ते जाबजबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करता आली नाही,’ असे सांगण्यात आले. ‘मटा’ ने याचा उल्लेख करून बुधवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली. त्याचे पडसाद पालिका वर्तुळात उमटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगररचना विभागाच्या तीन अधिकाऱ्यांनी दुपारी सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये जावून मंजूरपुरा टीडीआर प्रकरणाची कागदपत्रे सादर केली व गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *