facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / त्रास सहन करणे हीच देशभक्ती

त्रास सहन करणे हीच देशभक्ती

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू केली आहे. त्यामुळे देशात क्रांती घडणार आहे. या परिस्थितीत सीमेवर लष्कर त्यांची देशभक्ती दाखवत आहे, त्यामुळे जनतेनेही प्रामाणिकपणा दाखवणे गरजेचे आहे. नोटा बदल वा खात्यात जमा करण्याबाबत ५० दिवस त्रास सहन करणे, ही आजची खरी देशभक्ती ठरणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मोदींनी घेतलेल्या निर्णयामागे जनतेने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी फडणवीस यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात निर्माण झालेल्या वातावरणावर भाष्य केले. ‘पाकिस्तान सरकारच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एकाचवेळी त्यांच्या करन्सीसह भारताची करन्सी छापली जात होती. या खोट्या नोटा भारताच्या अर्थव्यवस्थेत आणल्या जात होत्या; पण मोदींच्या निर्णयाने एका रात्रीत पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळाले’, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘आपल्याच देशाच्या पैशांतून शस्त्रास्त्रे घेऊन आपल्याच देशात दहशतवादी हल्ले करणाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. दहशतवादी व नक्षलवाद्यांकडे एक पैसाही आता राहिला नाही. त्यामुळे काळा पैसा व बनावट नोटांविरुद्ध मोदींनी सुरू केलेल्या या लढाईत थोडा त्रास सर्वांनाच सहन करावा लागणार आहे.’

‘पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने तीन लाख कोटी काळा पैसा आतापर्यंत बाहेर आला असून, आणखी पाच ते दहा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *