facebook
Sunday , February 26 2017
Breaking News
Home / Featured / देवलापारमध्ये करा सफारी दिवसभराची

देवलापारमध्ये करा सफारी दिवसभराची

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला मिळणारा उत्तम प्रतिसाद बघून आता बफर झोनमधील पर्यटनालादेखील चालना देण्याचा निर्णय पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे. देवलापार वनपरिक्षेत्रात आता संपूर्ण दिवसभराच्या पर्यटनासाठी पर्यटकांना परवानगी देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे बफरमधील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा बाळगण्यात येते आहे. या परिसरात सध्या ३४ किमीचे रस्त्यांचे जाळे आहे. ते वाढवून ५० किमीपर्यंत नेण्याचा न‌िर्णय घेण्यात आला आहे. बफर झोनमधील पर्यटन वाढविणे आणि त्यातून स्थानिकांना रोजगार म‌िळवून देणे अशी भूमिका वारंवार मांडण्यात आली आहे. त्याचाच परिपाक ‌म्हणून हा न‌िर्णय घेण्यात आला आहे. देवलापार येथे सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी १९ वाहनांना सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता वाहनांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून प्रत्येकी ३० वाहने सफारीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी प्रत्येकी चार वाहने संपूर्ण दिवसभराच्या सफारीसाठी उपलब्ध राहतील. या सफारीदरम्यान, पर्यटकांना जंगलातील वॉच टॉवरवरून जंगल निरीक्षण करता येईल. दुपारी ११ ते ३ या वेळेत पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध राहील आणि यावेळी जिप्सी ड्रायव्हर आणि गाइडसही पर्यटकांबरोबर टॉवरवर उपस्थित राहतील.

तिप्पट शुल्क आकारणार!

दरम्यान, दिवसभराच्या या सफारीसाठी तिप्पट शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे. प्रवेश शुल्क व गाइड शुल्क यांचे दर हे सध्याच्या दरांपेक्षा तिप्पट, तर सफारीचे वाहन शुल्क हे दुप्पट राहील. या शिवाय, नागलवाडी, सालेघाट आणि चोरबावली येथेही पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *