facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / निफाडमध्ये सापडली ७३ लाखांची रोकड

निफाडमध्ये सापडली ७३ लाखांची रोकड

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान निफाड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन कारमध्ये ७३ लाख रूपयांची चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा हाती आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले होते.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असून, निफाड येथील शांतीनगर चौफुली येथील नाकाबंदीत वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी नाशिकहून कोपरगावकडे जाणाऱ्या करोला अल्टीस या कारच्या झडतीत ३२ लाख ९९ हजार च्या पाचशेच्या नोटा तर गुजरातकडून वैजापूरकडे जाणाऱ्या इर्टिका कारमध्ये ४० लाख रूपये झडतीत मिळाले. दोन्ही कारमध्ये एकूण ७२ लाख ९९ हजार रूपयांच्या ५०० च्या नोटांचे बंडल मिळाले आहेत. याबाबत निफाड पोलिसांनी आयकर विभागाला कळवले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *