facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / नोटा बदलण्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष

नोटा बदलण्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलताना किंवा पेट्रोलपंप, सरकारी कार्यालय, रुग्णालये अशा विविध ठिकाणी त्यांचा वापर करताना काही समस्या निर्माण झाली, तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना १०७७ या नंबरवर मोफत कॉल करून किंवा ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवताना येणार आहे.

पाचशे व हजाराची नोट चलनातून रद्द झाल्यामुळे नागरिकांना बँकेत रक्कम जमा करताना, बँक व एटीएम मधून रक्कम काढताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक, नागरी बँक, पोस्ट कार्यालय, पेट्रोलपंपचालक, सरकारी कार्यालय, रुग्णलयांनी नागरिकांना सहकार्य करावे. बँका व पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करण्याऐवजी एटीएम केंद्राचा वापर करावा. नागरिकांना नोटा बदलताना काही अडचणी आल्या तर त्यांनी नियंत्रण कक्षात तक्रार करावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *